Mon. Sep 27th, 2021

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयएमएकडून सर्तकतेचा इशारा

देशातील डॉक्टरांची प्रमुख संस्था इंडियन मेडिकल असोसिएशननने केंद्र सरकारला सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोना विरोधी लढाईत कुठलीही ढिलाई देऊ नये, असं आवाहन आएमएने केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट जवळ आली आहे. अशा कठीण स्थितीत विविध संस्थांचे अधिकारी आणि नागरिकांमध्ये कोरोना रुग्णांबाबत जो हलगर्जीपणा केला जात आहे त्यावरही आयएमएने नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटन आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी आणखी काही महिने आपण थांबू शकतो. पर्यटन आणि धार्मिक स्थळं उघडण्यात आली आहेत. लस न घेता नागरिक मोठ्या प्रमाणावर तिथे गर्दी करत आहेत. हे करोनाची तिसरी लाट येण्याचे कारण ठरू शकते असा इशारा आयएमएने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *