Tue. Dec 7th, 2021

वर्धा जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील लघु मध्यम तसेच मोठ्या सिंचन प्रकल्पाचे लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यांनातर याच तालुक्यातील पोथरा प्रकल्प देखील ९५ टक्के भरला आहे. येथील जलाशयाची पातळी २२९.२८ मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे लवकरच धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणात देखील जलाशयाची पातळी वाढली आहे. त्यामुळे सावध होत धरणाचे तीन दरवाजे उघडून १३.४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *