Tue. Dec 7th, 2021

राहुल गांधीसोबतची महिला खरंच ‘पॉर्नस्टार’?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एका विदेशी महिलेसोबतचा फोटो social media वर व्हायरल होत आहे. ही महिला एक porn star आहे. ती राहुल गांधींसोबत एका 5 star हॉटेलच्या बाहेर दिसली, असं पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र ही महिला खरोखरच porn star आहे, की आपण एका राष्ट्रीय स्तरावरील नेत्याबरोबरच एका स्त्रीचंही चारित्र्यहनन करत असल्याचं ही पोस्ट viral करणाऱ्यांना भान उरलं नसल्याचं स्पष्ट झालंय. कारण ही महिला porn star नसून स्पॅनिश अभिनेत्री आहे. या actress चं नाव नतालिया रामोस असं आहे.

नेत्याच्या बदनामीचं षडयंत्र

5 December 2018 रोजी हा फोटो आत्माराम थपालिया नामक एका व्यक्तीने Facebook वर हा फोटो फोस्ट करताना आक्षेपार्ह विधानही केलं होतं. ‘Porn Star नथाला रेमोसबरोबर पप्पू अमेरिकेच्या सर्वांत महागड्या हॉटेलमध्ये थांबला आहे. राजपुत्राने बँकेच्या रांगेत उभं राहून काढलेले 4 हजार रुपये आज खर्च करून टाकले.’ असं या post मध्ये त्याने लिहिलं होतं.

 

वास्तव काही वेगळंच

मात्र वास्तव काही वेगळंच आहे. जिला porn star म्हणून हिणवण्यात आलंय, ती महिला प्रत्यक्षात Spain मधील नामांकित Actress असून राहुल गांधी यांच्यासोबतचा तिचा फोटो 2 वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो खुद्द नतालियानेच Social Media वर share  केला होता. हे दोघे बेरुगेन इन्स्टिस्ट्युटने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान भेटले होते. यावेळी राहुल गांधी यांचे विचार ऐकून आपण प्रबावित झाल्याचं नतालियाने म्हटलं होतं.

 

Love Affair च्याही उठल्या अफवा

यापूर्वीही या फोटोमुळे राहुल गांधी आणि ही अभिनेत्री यांच्यात love affair असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांमधील प्रेमसंबंधांच्या बातम्या या केवळ अफवाच होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *