Sat. May 25th, 2019

आता परीट समाजाचं आरक्षणासाठी ‘असं’ आंदोलन

0Shares

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाज आणि मुस्लिम समाजही आरक्षणाची मागणी करत आहे. अशातच आता परीट समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होऊ लगाली आहे. या मागणीसाठी परीट समाजाकडून सांगलीत अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘कपडे धुणे’ आंदोलन करत परीट बांधवांनी विविध मागण्या यावेळी सरकारकडे केल्या आहेत.

परीट समाजाला आरक्षण तसंच विविध मागण्यांसाठी आज राज्यभर परीट समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही परीट समाजाकडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘कपडे धुणे आंदोलन’ करण्यात आलं. कार्यालयालच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर यावेळी परीट बांधवांना कपडे धुवत आरक्षणाची मागणी केली आहे.

संत गाडगे महाराजांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या गाण्यावर ठेका धरत हे आंदोलन पार पडलं.

आंदोलकांच्या मागण्या-

  • भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा
  • संत गाडगेबाबाना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं
  • संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून सरकारने घोषित करावा
  • अमरावती एक्सप्रेसला ‘संत गाडगेबाबा’ यांचं नाव देण्यात यावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *