Sat. Oct 1st, 2022

वसीम जाफरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

वसीम जाफरने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. वसीम जाफर गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारापासून दूर होता.

परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावर रणजी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत होता. वसीम जाफरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत रणजी क्रिकेटमध्ये अनेक वर्ष दमदार खेळी केली आहे.

वसीम जाफरची कारकिर्द

वसीम जाफरने प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतकी खेळी केली होती. तसेच जाफरने रणजी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.

वसीम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६० सामने खेळला आहे. यात त्याने एकूण ४२१ डावांमध्ये तब्बल १९ हजार ४१० धावा केल्या. यात ५७ शतकं तर ९१ अर्धशतकांचा समावेश आहे.

वसीम जाफरने एकूण ३१ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. या ३१ कसोटीतील एकूण ५८ डावात जाफरने एकूण १ हजार ९४४ धावा केल्या. यामध्ये ५ शतकं, २ द्विशतकं तर ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

वसीमची २१२ धावा ही टेस्टमधील सर्वोच्च खेळी ठरली.

वसीम जाफरने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील अखेरची टेस्ट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २००८ साली वानखेडे स्टेडिअमवर खेळला होता.

वसीम जाफरने वनडेमध्ये अवघ्या २ मॅचेस खेळल्या आहेत. तर आयपीएलमध्ये ८ सामने खेळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.