Fri. Aug 6th, 2021

मुंबईकरांसाठी 17.86 टक्के पाणीसाठा उपलब्ध

मुंबईकरांसाठी केवळ १७.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. गेल्या तीन वर्षात ही सर्वात कमी पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांसाठी पुरेल एवढा हा पाणीसाठा असल्याचं मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शहरात यापुर्वी नोव्हेबंर महिन्यातचं मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जर मान्सूनने उशिरा हजेरी लावली. मुंबईकरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. मात्र हा साठा ४५ दिवस आरामशीर पुरेल असंही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत पुढच्या काही दिवसात पाणीकपात 5 टक्यांनी वाढू शकते. गेल्या पाच वर्षापासून मुंबईकरांसाठीचं पाणीपुरवठ्याचं टार्गेट पुर्ण झाल आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र मुंबईकरांनी पाण्याचा गैरवापर करु नये असे आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आल आहे.

मुंबईकरांसाठी 17.86 टक्के पाणीसाठा उपलब्ध

भातसा धरणातून राखीव पाणीसाठा वापरणार आहे.

मूबईकरांना दररोज 4.200 मिलीयन लिटर पाणी लागतं.

मात्र  पालिका दिवसाला 3.800 मिलियन लिटर पाणीपुरवठा करत आहे.

30 एप्रिल 2019ला  2.58 लाख मिलीयन लिटर  पाणीसाठा होता.

2018 मध्ये  4 लाख 42 हजार मिलीयन लिटर पाणीसाठा शिल्लक होता.

2017 मध्ये 4 लाख 48 हजार 763 मिलियन लिटर पाणीसाठा आहे.

मुंबईकरांनी पाण्याचा गैरवापर करु नये असं आवाहन महापालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *