Fri. Jun 21st, 2019

पुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती; लाखो लिटर पाणी वाया

0Shares

पाणीटंचाई आणि कपातीचा सामना करत असतानाच आज पुणे शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पु. ल देशपांडे उद्यान, नवश्या मारुती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती दरम्यानच्या 1600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. त्याचवेळी हा बिघाड झाला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: