Mon. Dec 6th, 2021

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ!

कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल दिवसभरात तीन फूट तर रात्रीत एक फुटांनी वाढ झाली आहे.

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 33 पर्यंत पोहचली असून आयर्विन पुलाची इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 आहे.

अजूनही पाणी 35 फुटापर्यंत वाढणेची शक्यता असल्याने महापालिका यंत्रणेकडून जामवाडी परिसरातील बाधित होत असणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर सुरू केलं असून रात्रीत 25 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना सांगलीत पाचारण करण्यात आलंय.

तसंच सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान इस्लामपूर नजीकच्या काही गावात मागील पूर परिस्थिती लक्षात घेता तेथेही NDRFची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली आहे. तर सांगली शहरात एक तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, सांगलीच्या अमरधाम स्मशान भूमीत पुराचे पाणी शिरल्याने आज सकाळपासून रस्त्यावर मृतदेहावर अंत्यसंकार करावे लागत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *