Thu. May 6th, 2021

मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे

अमेरिकेतील जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाला एक मोठे यश प्राप्त झाले आहे.
मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे, नासाच्या संशोधनात माहिती झालं असून या ग्रहावर जीवसृष्टीचं असल्याचा अंदाज हा वैज्ञानिक वर्तविली आहे.

मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाच्या Curiosity रोवरनं महत्वाची माहिती मिळवली आहे. शिवाय या संशोधनाद्वारे मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाल्यानं नासा मंगळ ग्रहाच्या वातावरणाचे देखील अध्ययन करणार असून या ग्रहावर मनुष्य खरचं वास्तव्य करून शकतो का? असा अनेक गोष्टीचा उलगडा हा काही काळानंतर नासा करणार असल्याचं काही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

नासाचा रोवर गेल क्रेटरच्या मंगळावरील Aeolis Mons या मोठ्या दगडावर फिरत आहे.

मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात. Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास केला गेला असून तेथील शंभर फुट धुळीनं बनलेल्या लाल ग्रह म्हणजेच मंगळावरील दगडांच्या रचनेत बदल दिसून येतात. असं काही वैज्ञानिकांनी मतं आहे.

Mount Sharp च्या तळाच्या भागात ओली माती दिसून आली आहे. शिवाय त्याच्यावरील थरात वाळूची रचना आढळते.
जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता

मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले शिवाय माती ओली दिसून आली आहे आणि मंगळवरील वातावरण दमट असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. नासाच्या Curiosity रोवरला Mount Sharp ची संपुर्ण माहिती घ्यायची आहे. त्यानंतरच मंगळावरील बदलणाऱ्या वातावरणाची माहिती मिळणार आहे. मंगळ ग्रहावरील अनेक गोष्टीचा याद्वारे खुलासा होणार आहे.

वैज्ञानिक माहितीचा अभ्यास करणार

नासाचे वैज्ञानिक रोवरकडून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करणार असून Curiosity रोवरनं यापूर्वी देखील मंगळ ग्रहाचा व्हिडीओ पाठवला होता. त्यामध्ये मंगळावरील वादळांचं चित्रण होतं. तसेच मंगळ ग्रहावर
ओलम्पस मोन्स (Olympus Mons) मोठा पर्वत आहे. या पर्वताबद्ल देखील अनेक संशोधन सुरू आहे. येणार काळात मंगळ ग्रहाविषयी अनेक माहिती ही जगासमोर येणार आहे. यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *