Sun. May 16th, 2021

Waterpark मध्ये जाताय तर या गोष्टींपासून सावधान

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि उकळ्याने हैराण झाल्याने लोक वॉटर पार्क मध्ये पिकनिक मध्ये जाण पसंत करतात. मात्र जर तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह वॉटर पार्कमध्ये जाण्याचा बेत आखत असाल, तर थोडी काळजी घ्या. कारण नागपुरातील एका वॉटर पार्कमध्ये संपूर्ण दिवस धमाल केल्यानंतर तीसपेक्षा जास्त तरुणांच्या त्वचेला त्रास झाला आहे. त्यामुळे अशा वॉटर पार्कला जात असताना काळजी घेण्याची गरज आहे.

का होतय वॉटरपार्कमधील पाण्याचं इन्फेक्‍शन

नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 56 तरुण-तरुणींचा ग्रुप नागपूर जवळच्या एका वॉटर पार्कमध्ये गेला होता.

सर्वांनी दिवसभर वॉटर पार्कमध्ये विविध राईड्स आणि खेळांचा आनंद लुटला.

संध्याकाळपर्यंत धमाल करुन हा ग्रुप नागपूरला परत आला.

मात्र, परत आल्यावर दुसऱ्या दिवशी यातील अर्ध्या अधिक विद्यार्थ्यांच्या त्वचेवर इन्फेक्‍शन झालं.

या संदर्भात त्यांनी एक तक्रार खापा येथील पोलीस स्टेशन केली आहे.

पाण्यात क्‍लोरीन किंवा केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्यानं इन्फेक्‍शन झाले.

त्यामुळं उपचार आणि औषधाचा खर्च द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केलीय.

असाच प्रकार वसईच्या एका वॉटर पार्कमध्ये घडली आहे. 50 जण 30 एप्रिल रोजी या रिसॉर्ट मध्ये गेले होते.

यावेळी सर्वांच्या अंगाला खाज सुटली होती आणि  पूर्ण चेहऱ्याला सूज आली होती.

त्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इतर मुलांनाही असा त्रास झाला होता. कुणाच्या अंगावर तोंडावर पाठीवर पुरळ उठल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *