Fri. Aug 6th, 2021

नागपूरकरांवर ऐतिहासिक पाणीसंकट!

नागपुरात भर पावसाळ्यात पाणी कपातीचा संकट नागपूर शहरावर ओढवलं असून आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नागपूर महानगर पालिकेने घेतलाय. याचा सामना मात्र सामान्य नागपूरकरांना करावा लागणार आहे.

देशासहित राज्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस सुरु असताना मात्र विदर्भासह नागपुरवर वरूणराजा कोपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.

समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर शहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे.

याचा परिणाम पाणीपुरवठयावर होणार आहे.

शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सध्या शहरात ऐतिहासिक पाणी टंचाई असून पालिकेच्या इतिहासात पाहिल्यांदाच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवलीय.

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि पेंच मधला पाणीसाठा शून्य झाला असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी पुरवठा करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार पालिकेला करावा लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *