Sat. Jul 31st, 2021

नाशिक शहरात पाणीकपात सुरूच; महापालिका आयुक्तांचा निर्णय

सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणीकपात सुरू ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे. नाशिक शहरात पाणीकपाच रद्द करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे नाशिकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं ?

स्थायी समिती सदस्य निवड मुद्यावर महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक शहरात पाणीकपात सुरू असल्यामुळे या महासभेत राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि गुरमीत बग्गा यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला.

मात्र महापौरांनी प्रस्तावाचे दखल न घेता निवड प्रक्रिया सुरू केली.

त्यामुळे प्रस्ताव मांडणारे गजानन शेलार आणि गुरमीत बग्गा यांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला.

पाणी विषयावर प्रस्ताव असताना देखील महासभेत मांडला नसून भाजपाला नाशिककरांशी काहीच घेणं देणं नसल्याचा आरोप नगरसेवकांनी लावला आहे.

गंगापूर धरणात 90 टक्के पाणीसाठी असताना सुद्धा महापालिका आयुक्तांनी पाणीकपात सुरूच ठेवणार असल्याचे म्हटलं आहे.

गंगापूर धरण 34 टक्के भरले असून धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पाणीकपाती संदर्भात निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *