Sat. Sep 21st, 2019

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला

0Shares

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. औरंगाबाद महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचेच नगरसेवक महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त निपुण विनायक यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले बघायला मिळतायेत.

गुरुवारी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाण्याचा प्रश्न शिवसेना नगरसेवकांनी मांडल्यानंतर शुक्रवारीच शिवसेनेच्या नगरसेविका मीनाताई गायके यांनी रस्त्यावर उतरत महापौर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडलं.

तर पाणीप्रश्न लवकरात लवकर न मिटवल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिलाय.

औरंगाबादच्या वार्ड क्रमांक 93 हनुमान नगर येथील त्या नगरसेविका आहेत.

दूषित पाण्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.

याबाबत महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हनुमान नगर येथे शुक्रवारी भेट दिली, मात्र महापौर फक्त नावापुरतेच भेट देतात प्रत्यक्षात काम होत नाहीत, असा आरोप आता येथील नागरिक आणि नगरसेविका मीनाताई गायके यांनी केला आहे.

त्यामुळेच सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप शहरातील पाणी प्रश्नावर आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *