Wed. Oct 5th, 2022

‘आम्हाला भाजपाकडून त्रास दिला जातोय’ – निलोफर खान

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून अक आरोप-प्रत्यारोप समोर येत आहेत. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मलिकांच्या कुटुंबियांनी ईडी आणि भाजपवर आरोप केले आहेत. आम्हाला भाजपकडून त्रास दिला जात आहे, अशी प्रतिक्रिया निलोफर खान यांनी दिली आहे.

निलोफर खान म्हणाल्या, माझे वडील कधीच महसूलमंत्री राहिले नाहीत. मग महसूल विभागातील जबाब कसे घेतले? असा सवाल निलोफर खान यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्हाला भाजपकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही निलोफर खान यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, माझे वडिल नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली. मात्र, ईडीच्या रिमांड कॉपीत मलिकांना यात महसूल मंत्री म्हटले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून चुकीची माहिती देण्यात आली असल्याचा आरोप निलोफर खान यांनी केल आहे. तसेच जमीन खरेदी केली असल्याचे कागदपत्रे लवकर दाखवू. तर नवाब मलिकांना अटक करण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांसोबत काहीही चर्चा केली नसल्याचे निलोफर खान म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.