Mon. Jan 17th, 2022

… महाराष्ट्र लुटून खाऊ; अशोक चव्हाणांची भाजपावर टीका

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार असून स्वाभिमानी शेतकरीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपा सरकार लोकांना फसवण्याचे काम करत आहे. तसेच आपण दोघे भाऊ भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. तर झुठ बोलने वाला पंतप्रधान उसको काला कौआ काटेगा असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं.

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदींंवर हल्लाबोल केला.

एकेकाळी अमित शाह यांनी शिवसेनेला उखाड देंगे असे म्हणाले होते.

तर युती गेली चुलीत असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं.

लोकांना फसवण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे.

आपण दोघे भाऊ भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ अशी घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे ?

जेव्हा अमित शाह सोलापूरात आले होते, तेव्हा त्यांना लोकांनी काळे झेंडे दाखवले.

त्यामुळे मोदी घाबरून सोलापूरात आलेच नाहीत.

झुठ बोलनेवाला पंतप्रधान उसको काला कौआ काटेगा अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी या सभेमध्ये बोलत असताना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *