Sun. Sep 19th, 2021

आम्ही मालक नाही सेवक आहोत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण यात्रा मानली जात आहे अमरावती येथे या यात्रेचा आरंभ करण्यात आला. महाजनादेश यात्रेच्या सुरुवातीला सभास्थळी विदर्भाच्या विकासावर चित्रफीत दाखवून 5 वर्षात विदर्भासाठी केलेल्या उपाय योजना दाखवण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमावेत अनेक मंत्री या व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी या गावातून महाजनादेश यात्रेला सुरुवात करण्यात आली. आधुनिक काळात तुकडोजी महाराजांनी दिलेली गीता म्हणजे ग्रामगीता असल्याने गुरुकुंज मधून यात्रेला सुरुवात केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील जनतेचा पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. आम्ही मालक नाही सेवक आहोत, असं सुरुवातीलाच म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. आपण जे म्हटलं ते करून दाखवलं, हे केलेलं काम सांगायलाच ही यात्रा असल्याचं त्यांनी म्हटलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

15 वर्षात जे सरकारने केलं नाही ते 5 वर्षात केलं.

विदर्भातील विजेच्या कनेक्शन चा अनुशेष दूर केला.

विदर्भात 20 हजार कोटीच्या सिंचनाचे प्रकल्प सुरू केले.

विदर्भाच्या नावाने नेत्यांनी चांगभलं केलं.

गोसिखुर्द सारखे सिंचन प्रकल्प चार वर्षात मार्गी लावले.

आमचं सरकार आल्यानंतर विदर्भातील औद्योगिक विजेचे दर 3 रुपयांनी कमी केले.

मागच्या पाच वर्षात अमरावती MIDC मध्ये द्यायला जागा नाही, नवीन जागा अधिग्रहित करावी लागत आहे

देशातला सगळयात मोठा एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग विदर्भात होत आहे.

60 लाख शौचालय 5 वर्षात राज्यात तयार केले

महाराष्ट्राचा शिक्षणात तिसरा क्रमांक आहे.

गेल्या 2 वर्षात खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत 1 लक्ष विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

देशातील सर्वात जास्त रोजगार करणार महाराष्ट्र राज्य, देशाच्या तुलनेत 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात तयार केला.

3 लाख वरून 40 लाख कुटुंब 5 वर्षात बचत गटाशी जोडले.

असं एक ही क्षेत्र नाही ज्यात राज्य सरकर ने काम केलं नाही.

35 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग पुढच्या वर्षाखेरपर्यंत तयार झालेलं असेल

5 वर्षात 50 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले.

ग्राम विकास च्या माध्यमातून 30 हजार किलोमीटरचे रस्ते तयार केले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक रस्ते राज्यात तयार केले

15 वर्षात जे सरकार ने केलं नाही ते 5 वर्षात केलं.

विदर्भातील विजेच्या कनेक्शन चा अनुशेष दूर केला.

विदर्भात 20 हजार कोटीच्या सिंचनाचे प्रकल्प सुरू केले.

विदर्भाच्या नावाने नेत्यांनी चांगभलं केलं.

गोसिखुर्द सारखे सिंचन प्रकल्प चार वर्षात मार्गी लावले.

आमचं सरकार आल्यानंतर विदर्भातील औद्योगिक विजेचे दर 3 रुपयांनी कमी केले.

मागच्या पाच वर्षात अमरावती MIDC मध्ये द्यायला जागा नाही, नवीन जागा अधिग्रहित करावी लागत आहे.

60 लाख शौचालयं 5 वर्षांत राज्यात तयार केली.

महाराष्ट्राचा शिक्षणात 3 रा क्रमांक आहे.

गेल्या 2 वर्षात खाजगी शाळा सोडून जिल्ह परिषदेच्या शाळेत 1 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (FDI) मध्येही महाराष्ट्र पहिला आहे.

देशातील सर्वात जास्त रोजगार महाराष्ट्रात होतो.

देशाच्या तुलनेत 25 % रोजगार महाराष्ट्रात तयार केलाय.

5 वर्षांत 3 लाखांवरून 40 लाख कुटुंबं बचत गटाशी जोडली.

‘हाऊसफुल’चा बोर्ड!

असं एकही क्षेत्र नाही ज्यात राज्य सरकार ने काम केलं नाही.  या आधी मुख्यमंत्री दिल्लीवरून हाथ हलवत परत यायचे. मात्र मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो, तेव्हा तेव्हा मोदींनी भरभरून दिलं.

मला पत्रकार विचारात तुम्ही कोणाला शिल्लक ठेवणार का, भाजप कोणाच्याही मागे फिरणार नाही. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो जे चांगले नाही त्यांना ‘हाऊसफुल’चा बोर्ड दाखवतो.

पुन्हा निवडून येण्याची चिंता नसून दुष्काळाची असल्याचे त्यांनी म्हटलं.

आमच्या पिढीने दुष्काळ पहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

पुढच्या पाच वर्षात महाराष्ट कुठल्या राज्याशी तुलना करणार नाही, प्रगत राष्ट्राची तुलना करेल

‘मला आदेश महाजनादेश द्या’ असं म्हणत भाषणाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *