काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला
बिहार निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस पक्षातील काही नेते नाराज…

बिहार निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवचा सामना करावा लागला यामुळे काँग्रेस पक्षातील काही नेते या पराभवामुळे नाराज आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल त्यांनी म्हटलं लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत.
काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला आहे. काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. ही बाब सामान्य समजू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
मागील काही दिवसात काँग्रेस पक्षाला पराभवचा सामाना करावा लागत आहे त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते मनोबल खचलं आहे असं दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत काँग्रेस कितपत यशाची पायरी चढणार की नाही यात शंका आहे.