Mon. Oct 25th, 2021

एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही – राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहिसरमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच नाशिकमध्ये मनसेकडे सत्ता असताना केलेली कामांबाबत माहिती दिली. नाशिकमध्ये एकही खड्डा नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

सत्ताधाऱ्यांनी गेल्या ५ वर्षात केवळ राजीनाम्यांच्या धमक्या दिल्या आहेत.

सेनेच्या ‘ही ती वेळ’ या वाक्यावर टीका केली.

न्याय मागण्यासाठी लोकं माझ्याकडे येत आहेत.

५ वर्ष जनतेला मुर्ख बनवलं आहे.

नाशिकमध्ये खड्डेविरहित रस्ते बनवून दाखवले.

तुम्ही कामावर नाही, भावनेवर मतदान करतात.

नाशिकमधील डम्पिंग गाऊंड आणि पाण्याचा प्रश्न सोडवला.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळ नाही.

कोणाला जायचं २ तासात अहमदाबादला ? असा प्रश्न उपस्थित केला.

गुजरातला जाणारे ट्रेन ४५ टक्के रिकाम्या जातात.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काय झालं ?

स्मारकं उभारून काही नाही होणार.

७८ टोलनाके मनसेच्या आंदोलनानंतर बंद झाले.

एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही.

सत्ताधाऱ्यांना उलट प्रश्न विचारले जात नाही.

टोलमुक्तीचं सत्ताधाऱ्यांना विचारा

मंत्रालयात कधी मराठी गाणी लागतील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *