अण्णा हजारेंच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही – जयंत पाटील

लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 8 ते 10 दिवसांत येईल. मनसेशी मात्र युतीबाबत कसलीच चर्चा नसल्याची माहिती, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा आज पंढरपूरच्या भोसे गावात गेली होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा- ‘तुमच्या हातात काही नाही’ म्हणत अण्णांनी नाकारली महाजनांची भेट!
अण्णांना पाठिंबा नाहीच
‘अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याचा आमच्या सरकारच्या काळात कायदा केला. पण भाजपने त्यांच्या काळात याची अंमलबजावणी केली नाही. आपल्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येईल याची भीती त्यांना आहे’, असा आरोप पाटील यांनी केला.
हे ही वाचा- आता CMचीही होऊ शकते ‘In Camera’ चौकशी, कारण…
तसंच आता पुन्हा अण्णा हजारे उपोषणासाठी बसणार याची भाजपला भीती आहे. म्हणूनच आता त्यांनी माजी मुख्यमंत्र्याना चौकशीच्या कक्षेत आणले आहे. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःला चौकशी कक्षेत आणण्याची तयारी दाखवायला हवी होती, असंही जयंत पाटील म्हणाले.