Mon. Mar 30th, 2020

सिंगापूरमधील आयोजित कार्यक्रमात वडिल आणि आजीच्या मृत्यू विषयी राहूल गांधीचे शब्द

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

राहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला. एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, असं राहुल गांधी म्हणाले. ‘राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो.’ असं राहुल म्हणाले.

आम्ही आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे माफ केलं आहे, असं सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. ‘आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं’ असंही राहुल गांधी म्हणाले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.

1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रभाकरन नावाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिला सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. 1991 मध्ये चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती.तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

काँग्रेसने याचा जोरदार विरोध केला होता, मात्र त्यावेळीही राहुल गांधी यांनी वैयक्तिक मत देणं टाळलं होतं. अशा घटनांमुळे मारेकऱ्यांमागील मानवी चेहरा पाहा, पण कोणाचा तिरस्कार करु नका, हे आम्ही शिकलो, असं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री तुमच्याभोवती 15 जणांचा गराडा असतो, हा काही नेहरु-गांधी घराण्याचा वारस असल्याचा फायदा नाही, असं राहुल गांधी म्हणाले. घराणेशाहीच्या वादावर राहुल गांधींनी आपलं मत मांडलं.

‘प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचं 2009 मध्ये टीव्हीवर पाहिलं. तेव्हा दोन विचार मनात तरळले. हे अशाप्रकारे या माणसाला का त्रास देत आहेत. दुसरं म्हणजे त्याचे कुटुंबीय आणि पत्नीसाठी मला खूप वाईट वाटलं.’ असं राहुल यांनी सांगितलं. ‘प्रभाकरनने आपल्या बाबांना मारलं. त्याचा मृत्यू झाला, म्हणजे आपण आनंदी असायला हवं. आपण खुश का नाही’ असं आपण बहिणीला म्हटल्याची आठवण राहुल गांधींनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *