Fri. Sep 17th, 2021

काश्मीरप्रश्नी शांततेने तोडगा काढला पाहिजे – मलाला

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधकांसह पाकिस्तानमधूनही मोठा विरोध करण्यात आला आहे. पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई यांनी काश्मीरप्रश्नी भाष्य केले आहे. मलाला यांनी ट्विट करत यावर भाष्य केले असून भारत-पाकचा उल्लेख न करता ट्विट केले आहे.

काय म्हणाली मलाला युसुफझाई ?

पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई यांनी काश्मीरप्रश्नी ट्विट केले.

7 दशकांपासून सुरू असलेल्या काश्मीर समस्येवर संबंधित पक्षांनी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला पाहिजे असे मलाला यांनी म्हटलं आहे.

माझे आजोबा तरुण असल्यापासून काश्मीरी जनता संघर्ष करत आहे.

काश्मिरी मुलांनी हिंसाचार बघतच मोठी झाली असून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावे असे आव्हान आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे.

दक्षिण आशियाई देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय आमचे दुख: दूर करण्यात मदत करेल अशी अपेक्षा मलाला यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *