Fri. Feb 21st, 2020

घटक पक्ष म्हणून 20-22 जागा मागणार – अविनाश महातेकर

काही महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका असून सर्व राजकीय पक्ष यासाठी सज्ज झाली आहेत. विधानसभेत  भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा घटक पक्ष आरपीआयला जागा देणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र यंदा घटक पक्ष म्हणून आम्ही 20 ते 22 जागा मागणार असल्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अविनाश महातेकर ?

आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग लागली असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत.

युतीसोबत त्यांचा घटक पक्ष आरपीआयला सुद्धा जागा मिळणार आहे.

मात्र एनडीएचा घटक पक्ष असल्यामुळे आम्ही 20 ते 22 जागा मागणार आहे, असे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी म्हटलं आहे.

निवडणुकांमध्ये आमची मते भाजपासोबत शिवसेनेला मिळतात.

त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून आरपीआयला जागा मिळाल्या पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी केली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *