Sat. Jul 11th, 2020

तणावाची परिस्थिती असताना जम्मूमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार

लोकसभेसह राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर गणेशोत्सव काही दिवसांवरच असताना जम्मू-काश्मीरमध्ये गणोशोत्सव साजरा होईल का ? असा प्रश्न उपस्थित केला.  मात्र जम्मू येथील पुंछमध्ये बॉर्डरचा राजा म्हणून प्रसिद्ध गणपती यंदाही बसवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जम्मू मध्येही साजरा होणार गणेशोत्सव –

सर्वांचा आवडता सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

दरवर्षी प्रमाणे यंदाही जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याचे समजते आहे.

जम्मूच्या पुंछमध्ये बॉर्डरचा राजा म्हणून प्रसिद्ध गणपती बसणार आहे.

विशेष म्हणजे ही मूर्ती कुर्ला येथील श्री सिद्धिविनायक गणेश चित्रशाळा येथून तयारहून काश्मीरला पाठवण्यात येत असल्याचे समजते आहे.

जम्मू काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असताना गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

26 ऑगस्टपर्यंत ही मूर्ती जम्मू काश्मीरकडे रवाना होणार आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *