Jaimaharashtra news

‘भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तान हरेल’, इम्रान खानची कबुली!

भारत सरकारने कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान भारतावर टीका करत आहे. त्याला कुणाचाही पाठिंबा नसतानाही पाकिस्तान सरकार युद्धाच्या धमक्या देत आहे. मात्र त्याचवेळी जर भारताशी पारंपरिक पद्धतीने युद्ध झाल्यास पाकिस्तानचाच पराभव होईल, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अल-जझिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

आम्ही शांतताप्रिय!

इराक, व्हिएतनाम या देशांना युद्धामुळे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत.

भारताशी पारंपरिक पद्धतीने युद्ध झाल्यास पाकिस्तानचा पराभव होईल.

मात्र पराभवाची शक्यता असलेल्या राष्ट्राकडे दोन पर्याय असतात.

एकतर शरणागती पत्करणं किंवा शेवटपर्यंत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत राहणं.

पाकिस्तानवर अशी वेळ आल्यास पाकिस्तान शेवटपर्यंत लढत राहील.

पण जेव्हा अण्वस्त्रयुक्त देश शेवटपर्यंत लढतो, तेव्हा त्याचा शेवट किती भयानक असू शकतो, याची कल्पना करू शकता.

म्हणून युद्ध टाळण्याच्या दिशेने आम्ही संयुक्त राष्ट्राशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी संपर्क साधत आहोत.

पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे. मी स्वतः शांतीप्रिय आहे. त्यामुळे आमचा देश कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही.

Exit mobile version