Fri. May 7th, 2021

प्रेक्षकांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको – सुबोध भावे

नाटक पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांचे अनेकदा फोन वाजतात किंवा फोनचा वापर करताना दिसतात. मात्र यामुळे अभिनेत्यांना नाटक करताना त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अभिेनेता सुबोध भावेने याविरोधात ट्विट करत असं झाल्यास पुढे नाटकात काम करणं बंद करेन असे सुबोध भावे यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

काय म्हणाला सुबोध भावे ?

अनेकदा प्रेक्षक नाटकाचा आनंद घेत असताना मोबाईल वाजत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजणार असेल तर नाटकात काम करणं बंद करेन असे सुबोध भावने ट्विटरच्या माध्यामातून म्हटलं आहे.

नाटाकाचे प्रयोग सुरू असताना मोबाईल बंद करणे अनिवार्य असते.

मात्र तरीही अनेकदा मोबाईल वाजत असल्यामुळे नाटकात काही तरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नसल्याचे सुबोध यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे यापुढे नाटकात काम न करणे जेनेकरून फोनमध्ये आमची लुडबुड नको.

फोन महत्त्वाचा असून नाटक वरही बघता येत असल्याचे सुबोधने म्हटलं आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *