Mon. Aug 15th, 2022

सर्व 288 जागांवर निवडणूक लढणार – प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपल्या असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपली उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. रविवारी शिवसेनेने आणि कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी पक्षही उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद –

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत 288 जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच आज 120 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

तसेच मंगळवारपर्यंत संपूर्ण यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

रविवारी शिवसेनेने आणि कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.