Wed. Aug 10th, 2022

“दानवेंचा प्रचार करणार नाही” – जालन्याचे शिवसैनिक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना- भाजप यांच्यात युती झाली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी भाजप- सेनेच्या युतीवर घणाघाती टीकाही केली. शिवसेना स्वबळावर लढणार अशी घोषणा केली होती. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी तयारी करण्याचेही सांगण्यात आले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता सेना- भाजपाची युती झाल्यामुळे एकाच उमेदवाराला निवडणुक लढवता येणार आहे. आतापर्यंत स्वबाळावर लढणार असे नारा देण्यात येत होते. मात्र प्रतिस्पर्धी पक्षातील कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाचा प्रचार करावा लागणार असल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहे.जालना येथे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करणार नाही असे जालन्यातील शिवसैनिकांनी म्हटलं आहे. तसेच अर्जुन खोतकर यांना दानवे यांच्याविरोधात उभे राहण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

शिवसैनिक प्रचार करण्यास नकार का देतात ?

वितुष्टाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेविरोधात मोहीम राबवण्यात आली.

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले होते.

त्यामुळे शिवसैनिकांचा दानवेंविरोधात रोष आहे.

दानवे यांच्याविरोधात खोतकर यांना निवडणुकीत उभे करा, असे शिवसैनिकांनी मागणीही केली आहे.

युती झाली तरी मी मैदान सोडले नाही. तसेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.