Wed. Jul 28th, 2021

येत्या 48 तासांत महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता!

येत्या 48 तासात महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली भागातल्या घाट माथ्यावर 48 तासांत जोरदार पाऊस होईल.

तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असून हिंगोली, नांदेड मध्ये 13 ऑगस्टला एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण, गोवा परिसरामध्ये पुढचे पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता असून पालघर ठाणे,मुंबई या परिसरात 14 ऑगस्टला जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या परिसरात 13 आणि 14 ऑगस्टला जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *