Sat. May 25th, 2019

महाराष्ट्रातील ‘या’ भागांत दोन दिवसांत पावसाची शक्यता!

0Shares

बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात 16 आणि 17 डिसेंबरदरम्यान ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल, तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुकं राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात 15 ते 17 डिसेंम्बर रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *