Tue. Jun 28th, 2022

असा असेल यंदाचा मान्सून

देशात सलग चौथ्या वर्षी पाऊस सरासरी गाठणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यतासुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यात गेल्या ३० वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे तर देशात सलग चौथ्या वर्षी पाऊस सरासरी गाठणार असल्याची अंदाज हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केला आहे.

काय अंदाज आहे हवामान खात्याचा?

यंदा जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थितीमुळे पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.


आयएमडीतर्फे विविध मॉडेलचा आधार घेऊन गुरुवारी मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार, देशात यंदा सरासरी ९९ टक्के पावसाचे अनुमान असून, पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे.


विभागीय अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.


पुण्यात गेले ३० वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे.


मराठवाड्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यात गेल्या ३० वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे.  तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्येकडील अनेक राज्य, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.