Sun. Mar 24th, 2019

पंतप्रधान ‘मोदीं’वर वेबसीरिज

0Shares

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्याचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाबरोबरच मोदींवर एक वेब सिरीज देखील येत आहे. ‘मोदी’ असे या वेबसीरिज चे नाव असून ही वेब सीरिज दहा भागांची असणार आहे.

कधी होणार प्रदर्शित ?

नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर अनेक पुस्तकं लिहली गेली आहेत.

त्यांच्यावर अनेक डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्महृी बनवण्यात आला आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत  ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबरोबरच आता नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर वेब सीरीज येत आहे.

या सीरिजमध्ये अभिनेते महेश ठाकूर पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली आहे.

उमेश शुक्ला यांनी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या वेब सीरीजमध्ये मोदींचे बालपण आणि युवा जीवन पाहायला मिळणार आहे.

सीरिजमध्ये मोदींचा सामान्य व्यक्ती ते राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची  शपथ  घेतानाच्या  दृश्यावर ही सीरीज संपेल.

गुजरात, उत्तराखंड, दिल्ली अशा ठिकाणी या वेब सीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

‘मोदी’ असे या सीरिज चे नाव असून ही वेब सीरिज दहा भागांची असणार आहे.

येत्या एप्रिल महिन्यात ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असल्याची घोषणा इरॉस नॉऊनं केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *