Saturday, October 18, 2025

''या'' कारणामुळे धनत्रयोदशीला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या

Editor Name: Jaimaharashtra News

धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो.

यंदा धनत्रयोदशी शनिवारी, 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.

आज दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी धनत्रयोदशी तिथी सुरू होईल.

दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी धनत्रयोदशी तिथीची समाप्ती होईल.

धनत्रयोदशीचा संबंध समुद्र मंथनाशी असल्याचे मानले जाते.

समुद्रमंथनावेळी अमृतकलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले.

या कारणामुळे, भगवान धन्वंतरीला आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

या दिवशी माता लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांचीही पूजा केली जाते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)