Tuesday, November 04, 2025

गुरु नानक जयंतीचं विशेष महत्त्व

Editor Name: Jaimaharashtra News

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जन्मदिनानिमित्त गुरू नानक जयंती साजरी केली जाते

गुरू नानक यांचा जन्म एप्रिल 1469 मध्ये ''राय भोई दी तलवंडी'' (सध्याचे नानकाना साहिब, पाकिस्तान) येथे झाला

यंदा 5 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु नानक जयंती साजरी केली जाईल

शीख धर्मातील बांधवांसाठी गुरु नानक जयंती विशेष मानली जाते

गुरु नानक जयंतीला ''गुरु पर्व'' आणि ''गुरु नानक प्रकाश उत्सव'' म्हणूनही ओळखले जाते

यावर्षी गुरु नानक यांची 556 वी जयंती साजरी केली जाणार आहे

''एक ओंकार'' म्हणजेच ''देव एकच आहे, जो निरंकार, अनंत आणि सर्वव्यापी आहे, असे गुरू नानक यांचे मत होते

यादिवशी शीख धर्मातील बांधव गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरू नानक यांच्या शिकवणींचे स्मरण करतात

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)