उन्हाळा जवळ आल्यावर अनेकांनी आपल्या घरात एसी (AC) वापरण्यास सुरुवात केली. काहीजण वीज बिल कमी करण्यासाठी विविध उपाय करतात.
वीज बिल कमी करण्यासाठी रामबाण उपाय: तर आज आपण जाणून घेणार कोणते उपाय केल्याने वीज बिल कमी होऊ शकते.
एसी (AC) वापरकर्त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावे की एसीचे (AC) तापमान नेहमी 24 ते 26 डिग्रीवर असले पाहिजे. 1 डिग्री तापमान वाढवल्याने 6% पर्यंत पॉवर (Power) वाचवू शकता.
नेहमी पंख्याचा वापर करा: एसी (AC) वापरकर्त्यांनी एसीसोबत (AC) पंख्याचा वापर देखील करायला पाहिजे. हे कूलिंग पसरवते आणि एसी लोड कमी करते.
कमी वीज बिल मिळविण्यासाठी, नवीन एसी (AC) खरेदी करताना नेहमी उच्च स्टार रेटिंगकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बीईई (BEE) स्टार रेटिंग वीज बचत दर्शवते.
खिडकी आणि दरवाजे बंद करावे: खोलीत किंवा घराच्या आत थंड होण्यापासून रोखण्यासाठी, खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवणे महत्वाचे आहे. कूलिंग बाहेर जाऊ देऊ नका.
सूर्यप्रकाश अवरोधित करा: खोलीतील थंडपणा संतुलित ठेवण्यासाठी एसी कंप्रेसरला चालू ठेवतो. जर सूर्यप्रकाश थेट घरात आला तर खोली थंड होणार नाही.