ठरलं तर मग! गुलिगत सूरज चव्हाण अडकणार लग्नबंधनात

सूरज चव्हाणला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही

''बिग बॉस मराठी 5'' मध्ये आपल्या निरागस आणि प्रामाणिक स्वभावाने सूरजने प्रेक्षकांची मने जिंकली

सूरजच्या याच निरागस आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो ''बिग बॉस मराठी 5''चा विजेताही ठरला

अलीकडे सूरज पुन्हा चर्चेत आला आहे आणि यावेळी त्याचं कारणही तितकच खास आहे

काही दिवसांपूर्वी सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामवर केळवणचा व्हिडिओ शेअर केला होता

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने मोठ्या थाटामाटात सूरजचं केळवण केलं होतं

ज्यामुळे सूरज लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं

तसंच, सूरजने लग्नासाठी खरेदी करतानाचा एक वेगळाच व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली

अखेर सूरजने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली, सूरज चव्हाण संजना गोफणे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे

सूरजच्या लग्नाची आकर्षक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

सूरज आणि संजनाचं लग्न 29 नोव्हेंबर 2025 रोजी, सायंकाळी 6:11 वाजता, पुण्यातील सासवड येथे पार पडणार आहे

या खास सोहळ्याला राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे