Sunday, November 02, 2025

अखेर घटस्फोटांच्या चर्चेवर ऐश्वर्या रायने सोडलं मौन, म्हणाली...

Editor Name: Jaimaharashtra News

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे.

''उमराव जान'', ''गुरु'' आणि ''धूम'' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र काम केले.

''गुरु'' चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी सुरू झाली, असे सांगितले जाते.

त्यानंतर एप्रिल 2007 मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

मात्र गेल्या काही वर्षांपासून दोघं घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू होती.

यावर अभिषेक, ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अभिषेकचे घर सोडून ऐश्वर्या तिच्या आईसोबत राहत आहे, अशही चर्चा सुरू होती.

एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने घटस्फोटावर भाष्य केले.

''आम्ही घटस्फोटासारख्या गोष्टींचा विचारही करत नाहीत'', अशी प्रतिक्रिया ऐश्वर्याने दिली.

यादरम्यान ऐश्वर्याने जया बच्चन यांच्याबद्दल बोलणे टाळले.