प्रियंका चोप्राच्या ''एलिगन्ट लूक''वर खिळल्या सर्वांच्याच नजरा
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते
चित्रपटसृष्टीमध्ये इतकी सक्रिय नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते
मात्र आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा प्रियंका मनोरंजन क्षेत्रात कमबॅक करत आहे
''बाहुबली'', ''आरआरआर'' चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांच्या आगामी ''वाराणसी टु द वर्ल्ड'' या चित्रपटात दिसून येणार आहे
अशातच आता प्रियंकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे
यामध्ये तिचा एलिगन्ट लूक दिसून येत आहे
प्रियंकाने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे तसेच त्याला साजेसे असे हीरे-मोतीजडित दागिने परिधान केले आहेत
विशेषतः प्रियंकाच्या मांग टिक्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे
''चॅलेंजींग माय इनर देवी हॅशटॅग मंदाकिनी आणि वाराणसी'' असं कॅप्शन प्रियंकाने दिले
तिच्या या पारंपरिक लूकला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे