ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या जयंतीनिमित्त रंजक गोष्टी

डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारामध्ये झाला

डॉ. श्रीराम लागू यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले

त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली

वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉ. लागू यांनी काही काळ डॉक्टर म्हणून काम केले

डॉ. लागू यांनी 1969 मध्ये वसंत कानेटकर लिखित ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली

डॉ. लागू यांचा अभिनय क्षेत्रात रस होता. त्यांनी 250 हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांत आणि नाटकांत काम केले

मराठी रंगभूमीवरील ''नटसम्राट'' या गाजलेल्या नाटकात त्यांनी पहिल्यांदा अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली, जी अजरामर झाली

''सामना'' (1974), ''पिंजरा'' (1972), ''सिंहासन'' (1980) या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली

''मुकद्दर का सिकंदर'', ''लावारिस'', ''सरगम'' यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले

''सामना'' चित्रपटासाठी डॉ. लागू यांना 1975 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता

डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळामुळे 17 डिसेंबर 2019 रोजी निधन झाले