Sunday, November 02, 2025

''या'' कारणामुळे शाहरुखला ''बादशाह'' म्हणतात

Editor Name: Jaimaharashtra News

आज शाहरुख खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

शाहरुखने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शाहरुखचा ''बादशाह'' चित्रपट 27 ऑगस्ट 1999 रोजी प्रदर्शित झाला.

तेव्हापासून शाहरुखला ''बादशाह'' या नावाने ओळखले जाऊ लागले.

''बादशाह'' नाव का पडलं? हे संगीतकार अनु मलिक यांनी सांगितले.

''1999 मधील ''बादशाह'' चित्रपटातील ''बादशाह ओ बादशाह'' गाण्यामुळे शाहरुख खानला हे नाव मिळाले आहे'', असं अनु मलिक म्हणाले.

''बादशाह ओ बादशाह'' या गाण्याची धून अनु मलिक यांनी शाहरुखला फ्लाइटमध्ये ऐकवली होती.

''शाहरुखला या गाण्याची चाल खूप आवडली'', असंही अनु मलिक म्हणाले.

यानंतर अनु मलिक यांनी दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांना ''बादशाह ओ बादशाह'' या गाण्याबद्दल विचारले.

अब्बास-मस्तान यांना हे गाणे आवडले, कारण हे नाव चित्रपटाच्या नावाशी जुळत होते.

''या गाण्यामुळेच शाहरुखला बादशाह म्हणू लागले'', असं अनु मलिक म्हणाले