करण जोहरने 'या' चित्रपटाच्या रिमेकसाठी व्यक्त केली इच्छा
स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लॉंच करण्यासाठी करण जोहर नेहमीच चर्चेत असतो
करणने अनन्या पांडे, जान्हवी कपूरसारख्या अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लॉंच केले
नुकताच एका मुलाखतीत करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली
ज्यामुळे करण जोहर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे
सानिया मिर्झाच्या युट्युब चॅनेलवर करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या रिमेकबद्दल सांगितले आहे
'या चित्रपटाचा रिमेक बनवला तर कोणाला मुख्य भूमिकांमध्ये कास्ट कराल', असा प्रश्न सानियाने करणला विचारला
यावर करणने गंमतीमध्ये काही कलाकारांची नावे सुचवली आहेत
अंजलीच्या भूमिकेत आलिया तर राहुलच्या भूमिकेत रणवीर सिंह आणि टीनाच्या भूमिकेत अनन्या पांडे दिसेल
यादरम्यान करणने गंमतीमध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खानची नावेही टीनाच्या भूमिकेसाठी सुचवली