मराठमोळ्या गिरीजा ओकची देशभरात चर्चा
अभिनेत्री गिरीजा ओक सध्या चर्चेत आहे
काही दिवसांपूर्वी गिरीजाने लल्लनटॉपमध्ये मुलाखत दिली
या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे
अभिनेत्री गिरीजा ओकने लल्लनटॉपचे संपादक सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद साधला
गिरीजाने कॉलेजमधील फिजिक्स विषयाच्या प्राध्यापकाचा एका किस्सा सांगितला
''व्हॉट आर बेब्स?'', असा सवाल फिजिक्सच्या प्राध्यापकांनी आम्हाला विचारला, असं गिरीजा म्हणाली
यानंतर आम्ही सर्वजण स्तब्ध झालो. त्यानंतर त्यांनी पुन्हा विचारले ''व्हॉट आर बेब्स?''
''आम्हा विद्यार्थ्यांना समजेना की सर असं का विचारत आहेत?'' गिरीजा म्हणली
प्राध्यापकांनी पुन्हा एकदा ''व्हॉट आर बेब्स?'' हा प्रश्न विचारले
यानंतर सौरभ द्विवेदी यांनी गिरीजाला विचारले
''फिजिक्सच्या प्राध्यापकांना ''वेव्ज'' असं म्हणायचं होतं का?''
तेव्हा गिरीजा हसते आणि म्हणते ''हो''