Tuesday, October 28, 2025

विजय देवरकोंडाबरोबरच्या साखरपुड्यावर रश्मिकाचा खुलासा

Editor Name: Jaimaharashtra News

रश्मिका आणि विजय मागील गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असल्याची चर्चा सुरू आहेत.

रश्मिका आणि विजयने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमीदेखील समोर आली होती.

मात्र यावर दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

''थामा'' चित्रपटाच्या प्रोमोशनल इव्हेंटदरम्यान, विजयसोबतच्या साखरपुड्यावर रश्मिकाला प्रश्न विचारण्यात आले.

साखरपुड्याच्या प्रश्नावर रश्मिका म्हणाली की, ''याबाबत सर्वांनाच माहित आहे''.

रश्मिकाच्या उत्तरामुळे, ''दोघांनी खरंच साखरपुडा केलं का?'', असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

रश्मिकाने दिलेल्या उत्तरामुळे, चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने ''गीता गोविंदम्'' चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते.