बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला होणं, सामान्य आहे. मात्र हा त्रास जास्त वाढू शकतो. त्यामुळे बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासाठीचे घरगुती उपाय, जाणून घ्या...
Editor Name: Jaimaharashtra News
गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने खशात होणारी खवखव थांबते आणि आराम मिळतो.
खोकला झाल्यावर मध आणि आल्याचा वापर देखील करु शकता.
खोकल्यासाठी एक चमचा मध आणि थोडं आलं मिक्स करुन त्याचे सेवन करावे.
तुम्ही तुळशीची पाने किंवा काळी मिरी (मिरपूड) चहामध्ये टाकून पिऊ शकता. असे केल्याने खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
जर तुमचे नाक बंद असेल तर गरम पाण्यात ओवा किंवा पुदिन्याची पाने घालून वाफ घेऊ शकता.
याव्यतिरिक्त तुम्ही भाजलेला ओवा खाऊ शकता. यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
जर तुम्ही जास्त काळापासून सर्दी आणि खोकल्याने त्रस्त असाल तर डॉक्टरचा सल्ला घेणं, फायदेशीर ठरेल.