पेरू या फळाला बहुगुणी मानले जाते. पेरूमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. तसेच, फायबर आणि कार्बोहायड्रेट असतात.
पेरू खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर विविध परिणाम होऊ शकतात.
पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, अन्यथा सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.
एकाचवेळी, केळं आणि पेरू खाऊ नये. यामुळे, पोटात गॅस, डोकेदुखी, पित्तसंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
दूध आणि पेरूचे एकत्र सेवन केल्याने बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.
पेरू खाल्ल्यानंतर दह्याचे सेवन करू नये. यामुळे पोटदुखी, उलट्या, अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
पेरूचे सेवन केल्यानंतर त्वरीत ताक पिणे टाळावे. अन्यथा, छातीत जळजळ आणि पोटाची समस्या निर्माण होते.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)