Saturday, November 01, 2025

निरोगी आरोग्यासाठी सुरू करा ''या'' भाज्यांचे सेवन

Editor Name: Jaimaharashtra News

निरोगी राहण्यासाठी अनेकजण फळ, भाज्या, ड्रायफ्रुट्स यांसारख्या आहारांचे सेवन करतात.

तज्ज्ञांच्या मते ''या'' भाज्यांचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहण्यास मदत होते.

पालेभाज्या: मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, आदी खनिजे मिळू शकतात. या भाज्या रक्तशुद्धी करण्यास मदत होते.

गाजर: तज्ज्ञांच्या मते, गाजर खाल्याने त्वचा निरोगी राहते तसेच पचनक्रिया सुधारते. यात, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

रताळे: रताळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यात व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि फायबर यांचा समावेश आहे.

ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हाडे मजबूत होतात. तसेच हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)