पण फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते
संपूर्ण फळांमध्ये नैसर्गिक फायबर भरपूर असते, ज्यूस काढताना हे फायबर बऱ्याचदा कमी होते
फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
ज्यूसमध्ये फळातील नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात आणि पटकन शरीरात जाते, पण फळ खाल्ल्यास साखर हळूहळू पचते.
साखर हळूहळू शरीरात गेल्याने ती नियंत्रित राहते.
संपूर्ण फळ खाल्ल्यावर जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे जास्त खाणे टाळता येते.
फळ कापून किंवा रस बनवताना काही व्हिटॅमिन्स कमी होऊ शकतात, पण संपूर्ण फळात ती अधिक चांगली टिकून राहतात
ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या