Tuesday, October 28, 2025

पिवळे की काळे? निरोगी शरीरासाठी कोणते मनुके सेवन करावे?

Editor Name: Jaimaharashtra News

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी अनेकजण ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात.

ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत.

विशेषत: मनुक्यांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, सारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात.

पिवळ्या मनुक्यांमध्ये लोह, फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात.

पिवळ्या मनुक्यांमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन यांसारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात.

काळे मनुके वाळलेल्या द्राक्षांपासून बनवले जातात.

काळ्या मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, ते त्वचेला तरूण ठेवण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काळे मनुके फायदेशीर असतात.

जर तुम्हाला पचनासंबंधित समस्या किंवा तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर पिवळे मनुके चांगला पर्याय असू शकतो.

हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काळे मनुके उपयुक्त ठरू शकतात.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)