''या'' सोप्या पद्धतीने ओळखा सफरचंद बनावट आहे की नाही
Editor Name: Jaimaharashtra News
निरोगी शरीरासाठी अनेकांना सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.
सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत.
हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यांसारखे आजार कमी करण्यासाठी सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते.
संशोधकांच्या अभ्यासानुसार, सफरचंद खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
मात्र, रसायनांनी पिकवलेले काही सफरचंद बाजारात उपलब्ध झाले आहेत.
ज्यामुळे, आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे.
अशातच, आज आपण जाणून घेणार आहोत की नकली सफरचंद कसे ओळखावे?
खरेदी करण्यापूर्वी, सफरचंद चमकदार दिसत आहे की नाही तपासा.
अति-चमकदार सफरचंदावर मेणाचा थर किंवा रसायने असू शकतात, जे आरोग्यासाठी घातक आहेत.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या सफरचंदाचा रंग थोडासा हिरवा आणि लालसर असतो.
बनावट सफरचंद ओळखण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात सफरचंद घाला.
जर सफरचंद पाण्यात बुडालं तर, समजून घ्या याला नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यात आले आहे.
जर सफरचंद पाण्यात तरंगू लागले तर, समजून घ्या याला रासायनिकरित्या पिकवण्यात आले आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)