त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ''या'' फळांच्या रसांचे सेवन करा

बदललेली जीवनशैली किंवा चुकीच्या आहारांमुळे शरीरात अनेक बदल होतात

आजकाल, बाजारात मिळणाऱ्या रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते

त्वचेला निरोगी आणि तजेलदार बनवण्यासाठी अनेक लोकं नैसर्गिक उपाय करतात

त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ''या'' फळांचे रस नक्की ट्राय करा

डाळिंबाचा रस: डाळिंबाचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार, ताजीतवानी आणि तरुण बनवण्यासाठी मदत होते

संत्र्याचा रस: यामध्ये विविध जीवनसत्त्वे असल्याने त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच, त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो

आवळ्याचा रस: आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा कमी होतात तसेच त्वचेची लवचिकता वाढते

बीट ज्यूस: बीट ज्यूस प्यायल्याने त्वचेची चमक वाढते आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात

लिंबाचा रस: लिंबाचा रस प्यायल्याने यामधील कोलेजन त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते

पपईचा रस: पपईच्या रसात विविध जीवनसत्वे असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रेषा कमी होतात

सफरचंद रस: सफरचंद रस प्यायल्याने यातील ऑक्सिडंट्स त्वचेतील वृद्धत्व कमी करते आणि त्वचा हायड्रेट ठेवते

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)