कामाचा व्याप वाढल्यामुळे ताणतणाव अधिक वाढतो. त्याचा परिणाम केवळ कामावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो
झोपेच्या बाबतीत तडजोड करु नका, 7 तासांपेक्षा कमी झोप मेंदूच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नसते म्हणूनच पूर्ण झोप घेणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या गरजेचे आहे
नियमित व्यायाम करा, सतत काम केल्याने पाठ, खांदा, कंबर आणि मानेवर परिणाम होतो. अशा स्थितीत व्यायामाशी मैत्री केल्यास शरीराला वेदनांपासून आराम मिळतो
दिवसभर फोनमध्ये मग्न राहणे ही मानसिक समस्या वाढवण्याचे काम करते, म्हणून फोन वापरणे कमी करा
रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरल्यास त्याचा परिणाम थेट झोपेवर होतो
जर तुम्हाला जास्त टेन्शन येत असेल, तर कामाचा ताण टाळण्याचा प्रयत्न करा आणि विश्रांती घ्या, तसेच सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात थोडा वेळ घालवा
जे लोक कामातून ब्रेक घेतात आणि स्वत:साठी वेळ देतात त्यांचे मानसिक आरोग्य कायमच चांगले राहते, म्हणूनच काही वेळ काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक आहे